मुंबई -आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. तेव्हा दीपक चहरच्या गोलंदाजीसमोर पंजाबच्या टॉप ऑर्डरने शरणागती पत्कारली. या दरम्यान एक अशी घटना घडली, ती पाहून कर्णधार महेंद्रसिंह धोनी डीआरएसचा किंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
दीपक चहर त्याच्या स्पेलचा तिसरे षटक फेकत होता. त्याने या षटकात एका इनस्विंग चेंडूवर फलंदाजाविरुद्ध एलबीडब्लूचे अपील केले. पण पंचानी त्याचे अपील फेटाळून लावले. दीपक चहरला ही विकेट असल्याचा विश्वास होता. तेव्हा त्याने धोनीकडे इशारा करत डीआरएस घेण्याची मागणी केली. परंतु, धोनीने डीआरएस न घेता दीपक चहरला, जा.. जा... पुन्हा गोलंदाजीसाठी जा असे सांगितले.