महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

MI vs PBKS : मुंबई-पंजाब यांच्यात आज टॉप-4 साठी कडवी झुंज

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज सायंकाळी कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे. पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स या हंगामात पिछाडीवर आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मुंबई आणि पंजाब यांच्यासाठी आजचा सामना महत्वाचा आहे.

IPL 2021 mi vs pbks  : Struggling mumbai indians face inconsistent Punjab Kings
MI vs PBKS : मुंबई-पंजाब यांच्यात आज टॉप-4 साठी कडवी झुंज

By

Published : Sep 28, 2021, 3:31 PM IST

Updated : Sep 28, 2021, 3:41 PM IST

अबुधाबी - आयपीएल 2021 मध्ये आज बुधवारी एक नाही तर दोन सामने होणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज सायंकाळी कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे. पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स या हंगामात पिछाडीवर आहे. त्यांना 10 पैकी केवळ 4 सामन्यात विजय मिळवता आला आहे. यूएईत सुरू असलेल्या दुसऱ्या सत्रात त्यांना अद्याप विजय मिळवता आलेला नाही. प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मुंबई आणि पंजाब यांच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे.

मुंबई इंडियन्सची आतापर्यंत फलंदाजी डोकेदुखी ठरली आहे. त्यांची वरची फळी आणि मधल्या क्रमांकातील फलंदाज धावा करताना संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्धच्या सामन्यात तर मुंबईच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. इशान किशन, सूर्यकुमार यादव, केरॉन पोलार्ड, कृष्णाल पांड्या आणि हार्दिक पांड्या धावा करण्यात अपयशी ठरले आहेत. हे खेळाडू लयीत यावे, अशी आशा रोहित शर्माची असणार आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट वगळता अन्य गोलंदाज महागडे ठरले आहेत. यामुळे गोलंदाजीत बदल पाहायला मिळू शकतील.

मुंबईसोबत पंजाबसाठी देखील फलंदाजी चिंतेचा विषय आहे. केएल राहुल आणि मयांक अगरवाल वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. पण एडन मार्करम सातत्याने धावा करत आहे. गोलंदाजी रवि बिश्र्नोईने मागील सामन्यात टिच्चून गोलंदाजी केली होती. याशिवाय मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग चांगला मारा करत आहेत. पंजाबला डेथ ओव्हरमध्ये नॅथन एलिच्या रुपाने चांगला गोलंदाज मिळला आहे.

मुंबई-पंजाब हेड टू हेड आकडेवारी -

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सचा संघ आयपीएलमध्ये 27 वेळा आमने-सामने झाले आहेत. यात दोन्ही संघाची चांगली कामगिरी केली आहे. 14 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. तर 13 सामन्यात पंजाब किंग्सचा संघ विजयी ठरला आहे.

हे ही वाचा -RR VS SRH : हैदराबादचा राजस्थानवर सात गड्यांनी विजय; जेसन रॉय आणि केन विल्यमसन यांची अर्धशतके

हे ही वाचा -KKR Vs DC : केकेआरने नाणेफेक जिंकली, दिल्लीची प्रथम फलंदाजी

Last Updated : Sep 28, 2021, 3:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details