अबुधाबी - मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये सामना रंगला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये नॅथन कुल्टर नाइल आणि सौरव तिवारीची वापसी झाली आहे. तर इशान किशन आणि एडम मिल्ने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दुसरीकडे पंजाबचा सलामीवीर फलंदाज मयांक अगरवाल दुखापतीमुळे बाहेर गेला. त्याच्या जागेवर आज मनदीप सिंहला अंतिम संघात स्थान मिळाले आहे.
मुंबई-पंजाब हेड टू हेड आकडेवारी -
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सचा संघ आयपीएलमध्ये 27 वेळा आमने-सामने झाले आहेत. यात दोन्ही संघाची चांगली कामगिरी केली आहे. 14 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. तर 13 सामन्यात पंजाब किंग्सचा संघ विजयी ठरला आहे.
- पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन
- के एल राहुल (कर्णधार), मनदीप सिंह, ख्रिस गेल, एलेन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, हरप्रीत बरार, नाथन एलिस, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह.
- मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, सौरव तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, नॅथन कुल्टर नाइल, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
हेही वाचा -MI vs PBKS : मुंबई-पंजाब यांच्यात आज टॉप-4 साठी कडवी झुंज
हेही वाचा -पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका