अबुधाबी -आयपीएल 2021 मध्ये दुसऱ्या सत्रात आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगला आहे. उभय संघातील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये खेळला जात आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स हेड टू हेड रेकॉर्ड -
उभय संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 28 वेळा आमने-सामने झाले आहेत. यातील 22 सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स संघाला फक्त 6 सामने जिंकता आली आहे. मागील सहा हंगामात केकेआरला फक्त एका सामन्यात मुंबईवर विजय मिळवता आला आहे. मागील 12 पैकी 11 सामने मुंबईने जिंकली आहेत. ही आकडेवारी पाहता मुंबईचे पारडे जड आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन -