अबुधाबी -चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सचा रोमांचक सामन्यात 2 गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या संघावर पराभवाचे सावट होते. तेव्हा रविंद्र जडेजाने स्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
महेंद्रसिंग धोनी सामना संपल्यानंतर बोलताना म्हणाला की, अबुधाबीच्या उष्ण वातावरणात गोलंदाजांनी लहान लहान स्पेलमध्ये गोलंदाजी करत कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध विजयात महत्वाची भूमिका निभावली.
आम्ही चांगली गोलंदाजी केली असे मला वाटते. येथील वातावरण किती उष्ण आहे, हे आपण विसरले नाही पाहिजे. अशात हा सामना दुपारी होता. त्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी हे सोपे नव्हते. यामुळे आम्ही गोलंदाजांकडून लहान लहान स्पेलमध्ये गोलंदाजी करून घेतली. एक किंवा दोन षटकाच्या स्पेलमुळे गोलंदाजांची ऊर्जा टिकून राहिली, असे देखील धोनी म्हणाला.
आमच्या गोलंदाजांनी चांगले काम केले. परंतु 170 हा चांगला स्कोर होता. कारण हा सामना पहिल्या सारखा नव्हता. कारण विकेट स्लो होती. जेव्हा रविंद्र जडेजा गोलंदाजी करत होता. तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की चेंडू थांबून येत होता. पण आम्ही ज्या पद्धतीने सुरूवात केली. ते पाहता मला वाटत की, केकेआर खरेच कौतुकास पात्र आहे, कारण त्यांनी शानदार वापसी केली होती, असे देखील धोनी म्हणाला.
दरम्यान, चेन्नईला अखेरच्या 12 चेंडू 26 धावांची गरज होती. तेव्हा रविंद्र जडेजाने 19व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाचा खरपूस समाचार घेतला. त्याने 2 चौकार आणि 2 षटकारासह कृष्णाच्या षटकात 22 धावा वसूल केल्या आणि सामना चेन्नईच्या दिशेने झुकवला. पण अखेरच्या षटकात सुनिल नरेनने सॅम कुरेन आणि जडेजाला बाद करत सामन्यात रंगत आणली. तेव्हा दीपक चहरने अखेरच्या चेंडूवर विजयी धाव घेत केकेआरच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा -SRH vs RR : प्ले ऑफ शर्यतीत राहण्यासाठी राजस्थानला विजय आवश्यक; समोर हैदराबादचे आव्हान
हेही वाचा -IPL 2021 : आरसीबीने मुंबई इंडियन्सचा केला 54 धावांनी पराभव