दुबई - पंजाब किंग्सला मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात, अखेरच्या षटकात विजयासाठी अवघ्या 4 धावांची गरज होती. तेव्हा पंजाबचा संघ हा सामना सहज जिंकणार असे सर्वांना वाटत होते. पण राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज कार्तिक त्यागीने निकोलस पूरन आणि दीपक हुड्डा यांना बाद करत सामन्याचे चित्र पालटवले. कार्तिकने या सामन्यात एक धाव देत आपल्या संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे निराश झाले.
अनिल कुंबळे यांनी, पंजाबचा संघ मोक्याच्या क्षणी हाराकिरी करून पराभूत होतो, याची संघाला सवय झाल्याची कबुली दिली. ते म्हणाले की, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दोन धावांनी झालेला पराभव पचवणे खूप कठिण आहे. आम्ही मैदानात स्पष्ट मॅसेज पाठवला होता की, 19 व्या षटकातच विजय मिळवायचा आहे. यापद्धतीने खेळ करा. पण दुर्दैवीरित्या आम्ही सामना अखेरपर्यंत खेचून घेऊन गेलो. अंतिम दोन चेंडूवर जेव्हा नवा फलंदाज समोर येतो तेव्हा हे गोलंदाजासाठी एक लॉटरीप्रमाणे ठरलं.
कार्तिक त्यागीचे अनिल कुंबळेनी केलं कौतुक