दुबई -आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात रविवारी दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने अत्यंत अटातटीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचा अखेरच्या चेंडूवर पराभव केला. चेन्नईने हा सामना 2 गडी राखून जिंकला. यात दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला.
आयपीएल 2021 मध्ये रविवारी झालेल्या सामन्यानंतर गुणातालिकेत मोठे बदल पाहायला मिळाले. आरसीबीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ सातव्या स्थानी घसरला आहे.
मुंबई इंडियन्स, केकेआर, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघाचे समान प्रत्येकी 8-8 गुण आहेत. पण नेट रनरेटमुळे मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या स्थानी घसरला आहे. केकेआर चौथ्या, पंजाब पाचव्या आणि राजस्थान सहाव्या स्थानावर आहे.