अबुधाबी -आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 171 धावा केल्या आहेत आणि चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. तर चेन्नईकडून शार्दुल ठाकूर आणि हेझलवूड यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने चांगली सुरूवात केली. शुबमनने दीपक चहरच्या पहिल्या षटकात सलग दोन चौकार मारले. परंतु या षटकाचा अखेर नाटकीय असाच झाला. पाचव्या चेंडूवर चेन्नईने गिलविरोधात पायचितचे केले. तेव्हा पंचानी त्याला बाद ठरवले. यानंतर गिलने रिव्ह्यू घेतला. यात तिसऱ्या पंचानी त्याला नाबाद ठरवले. पण त्यानंतर पुढील चेंडूवर गिल धावबाद झाला. त्याला रायुडूने माघारी धाडलं.
शुबमन गिलने 5 चेंडूत 9 धावांची खेळी केली. यानंतर चौथ्या षटकात राहुल त्रिपाठी मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. पण पंचानी हा चेंडू नो बॉल ठरवला. यामुळे त्रिपाठीला जीवदान मिळाले. त्रिपाठी-अय्यर ही जोडी शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने अय्यरला धोनीकरवी झेलबाद केले. अय्यरने 15 चेंडूत 18 धावांची खेळी केली. यानंतर आलेला इयॉन मॉर्गन (8) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याचा सीमारेषेवर सुरेश झेल फाफ डू प्लेसिसने घेतला.