महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : चहलने पहिली विकेट घेताच धनश्रीला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ - युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यात एकही गडी बाद करता आला नव्हता. त्याच्या विकेटची पाटी रिकामी होती. पण कोलकाताविरुद्धच्या सामन्यात चहलने टिच्चून मारा केला. या सामन्यात त्याने नितीश राणाला माघारी धाडत विकेटचे खाते उघडले. चहलने जेव्हा पहिली विकेट घेतली तेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या धनश्रीला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

ipl 2021 : Dhanashree Verma gets emotional after Yuzvendra Chahal gets his maiden wicket in the tournament
IPL २०२१ : चहलने पहिली विकेट घेताच धनश्रीला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ

By

Published : Apr 19, 2021, 1:49 PM IST

मुंबई -आयपीएलच्या चौदाव्या हंगामात रविवारी पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव करत स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. या सामन्यात बंगळुरूचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने या हंगामातील पहिली विकेट घेतली. यानंतर चहलची पत्नी धनश्री भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

युजवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यात एकही गडी बाद करता आला नव्हता. त्याच्या विकेटची पाटी रिकामी होती. पण कोलकाताविरुद्धच्या सामन्यात चहलने टिच्चून मारा केला. या सामन्यात त्याने नितीश राणाला माघारी धाडत विकेटचे खाते उघडले. चहलने जेव्हा पहिली विकेट घेतली तेव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या धनश्रीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आता हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात चहलने ४ षटकांत ३४ धावा देऊन २ गडी बाद केले. या सामन्यात त्याने सलामीवीर नितीश राणा आणि संघाचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक अशा महत्त्वाच्या विकेट घेतल्या. दरम्यान, या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (७८) आणि डिव्हिलियर्स याच्या नाबाद ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूने २० षटकांत ४ बाद २०४ धावांचा डोंगर उभारला. बंगळुरूच्या विशाल २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाला २० षटकांत ८ बाद १६६ धावांपर्यंत मजल मारता आली. परिणामी बंगळुरूने हा सामना ३८ धावांची जिंकला.

हेही वाचा -IPL २०२१ Points Table : दिल्लीचा मुंबईला दे धक्का, जाणून घ्या इतर संघाची स्थिती

हेही वाचा -IPL २०२१ : विजयी अभियान कायम ठेवण्याचे लक्ष्य; चेन्नई-राजस्थानमध्ये आज सामना

ABOUT THE AUTHOR

...view details