अहमदाबाद - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना रंगला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीने आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या जागेवर वेगवान गोलंदाज इशांत शर्माला अंतिम संघात स्थान दिलं आहे. दुसरीकडे बंगळुरूने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी नवदीप सैनी आणि डेन ख्रिश्चियन यांच्या जागेवर रजत पाटीदार आणि डॅनियल सॅम्सला संधी दिली आहे.
दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू हेड टू हेड आकडेवारी
उभय संघातील आकडेवारी पाहिल्यास यात बंगळुरूचा पगडा भारी आहे. बंगळुरूने १५ सामने जिंकली आहेत. तर दिल्ली संघाला १० सामन्यात विजय साकारता आला आहे. एक सामन्याचा निकाल लागलेला नाही.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -