महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : पंतच्या दिल्लीसमोर आज कोहलीच्या चॅलेजर्सचे आव्हान

आयपीएल २०२१ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना होणार आहे.

IPL 2021 : Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore match preview
IPL २०२१ : पंतच्या दिल्लीसमोर आज कोहलीच्या चॅलेजर्सचे आव्हान

By

Published : Apr 27, 2021, 3:23 PM IST

अहमदाबाद - आयपीएल २०२१ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा मागील सामना गमावला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्सविरुद्धचा सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास वाढला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ५ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची मदार सलामी जोडी विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांच्यावर असणार आहे. तर मधल्या फळीत एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून अपेक्षा आहेत. तर बंगळुरुचा हर्षल पटेलने हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. पण तो चेन्नईविरुद्धच्या मागील सामन्यात चांगलाच महागडा ठरला होता. त्याला आजच्या सामन्यात लय प्राप्त कराली लागणार आहे. तसेच हर्षलला अन्य गोलंदाजांची उत्तम साथ भेटली पाहिजे.

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन ही जोडी दिल्लीला उत्तम सुरुवात करुन देत आहे. मात्र मधल्या फळीत कर्णधार ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यातच आता रविचंद्रन अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली आहे. पण तरीदेखील अमित मिश्रा आणि अक्षर पटेल हे चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने दिल्लीला चिंता करण्याची गरज नाही.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
  • विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडीक्कल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, कायले जेमीसन, डॅन ख्रिश्चियन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत आणि फिन एलन.
  • दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
  • ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टिजे, इशांत शर्मा, आवेश खान, स्टिव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरीवाला, एम सिद्दार्थ, टॉम कुरेन आणि सॅम बिलिंग्स.

हेही वाचा -सलग ४ पराभवानंतर केकेआरला विजय; ५ गडी राखून पंजाबवर मात

हेही वाचा -IPL २०२१ : ‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’

ABOUT THE AUTHOR

...view details