महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : दिल्लीसमोर आज पंजाबचे आव्हान - आयपीएल २०२१ आजचा सामना

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे.

IPL 2021 :  Delhi Capitals vs Punjab Kings match preview
IPL २०२१ : दिल्लीसमोर आज पंजाबचे आव्हान

By

Published : Apr 18, 2021, 1:51 PM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपला मागील सामना गमवला आहे. यामुळे दोन्ही संघ विजयी लय प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहेत. उभय संघातील आजच्या सामन्याला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रात्री ७ वाजून ३० मिनिटाला सुरूवात होणार आहे.

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हे दोघेही स्वस्तात बाद झाले. आज त्यांच्याकडून चांगल्या सुरूवातीची आपेक्षा दिल्ली संघाची असेल. शॉ व धवन वगळता अजिंक्‍य रहाणे, मार्कस स्टॉयनिस हे प्रमुख फलंदाज फारसे भरात नाहीत. ललित यादवकडून त्यांना रास्त अपेक्षा आहेत. कर्णधार ऋषभ पंतने सातत्य राखले आहे. गोलंदाजीत आवेश खान चांगला मारा केला आहे. स्टॉयनिस, अश्‍विन व कुरेन यांनीही समर्थपणे जबाबदारी पेलली आहे. आजच्या सामन्यात एनरिक नॉर्टिजे याला अंतिम संघात संधी मिळू शकते.

दुसरीकडे पंजाब संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांची फलंदाजी हीच त्यांची खरी ताकद आहे. मात्र, सलामीवीर मयांक अग्रवालला येत असलेले अपयश त्यांची चिंता वाढवणारे ठरत आहे. कर्णधार लोकेश राहुल सातत्यपूर्ण कामगिरी करत असला तरीही त्याला मधल्या फळीत ख्रिस गेल, दीपक हुडा व्यतिरिक्त अन्य कोणाचीही साथ लाभलेली नाही. पंजाबची गोलंदाजी काहीशी कमकुवत आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वगळता त्यांची गोलंदाजी नवखी आहे. अर्शदीप सिंगने राजस्थानविरुद्ध सरस गोलंदाजी केली आहे. पण त्यांचे रिचर्डसन आणि रिले मेरेडिथ महागडे ठरले आहेत.

हेही वाचा -IPL २०२१ : केरॉन पोलार्डचा विक्रमी 'षटकार' पहिलात का?

हेही वाचा -IPL २०२१ Points Table : मुंबईची गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप; जाणून घ्या इतर संघाची स्थिती

ABOUT THE AUTHOR

...view details