महाराष्ट्र

maharashtra

IPL २०२१ : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी दिल्ली संघासाठी आनंदाची बातमी

By

Published : Apr 20, 2021, 3:01 PM IST

दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा फिट झाला असून तो संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

IPL 2021: Delhi Capitals' pacer Ishant Sharma fit to play - sources
IPL २०२१ : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी दिल्ली संघासाठी आनंदाची बातमी

चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. या लढतीआधी दिल्ली संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा फिट झाला असून तो संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

इशांत शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. आता तो फिट असल्याची माहिती समोर येत आहे. एएनआयशी बोलताना दिल्ली संघातील सूत्रांनी सांगितलं की, 'इशांत फिट झाला असून तो मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.'

दिल्ली संघाने आपल्या तीन लढतीत दोन विजय मिळवले आहेत. आज त्यांचा सामना दिल्लीशी होणार आहे. दरम्यान, इशांत शर्मा फिट असला तरी या लढतीत त्याची खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्याच्या अनुपस्थितीत आवेश खानने प्रभावी मारा केला आहे. त्यामुळे इशांतला अंतिम संघात संधी मिळणे कठीण आहे.

  • मुंबई इंडियन्सचा संघ -
  • रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, हार्दिक पांड्या, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, ईशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, एडम मिल्ने, नाथन कोल्टर नाइल, पीयूष चावला, जेम्स नीशाम, युद्धवीर चरक, मार्को जेनसन आणि अर्जुन तेंडुलकर.
  • दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
  • ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, आर अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्जे, इशांत शर्मा, आवेश खान, स्टीव स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरिवाला, शम्स मुल्‍लाणी, एम सिद्धार्थ, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स आणि अनिरूद्ध जोशी.

हेही वाचा -IPL २०२१ : भेटा राहुल चहरच्या 'हमसफर' हेयर स्टायलिस्टला

हेही वाचा -IPL २०२१ : 'बॉल सूखा है घूमेगा', चाणाक्ष धोनीची कमाल आणि राजस्थान पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details