मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सने कोरोनावर मात केली आहे. तो संघासोबत जोडला गेला आहे. याची माहिती बंगळुरू संघाच्या व्यवस्थानाने एक निवेदन जारी करत दिली.
आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे ७ एप्रिलला डॅनियल सॅम्सला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याने कोरोनावर मात केली आहे. तो संघाच्या बायो बबलममध्ये सामील झाला आहे.
दरम्यान, डॅनियल सॅम्स हा बंगळुरूचा दुसरा खेळाडू आहे, ज्याला कोरोनाची लागण झाली होती. याआधी बंगळुरूचा स्टार सलामीवीर देवदत्त पडीकक्कल यालाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आढळल्यानंतर तो देखील संघात सामील झाला.