अबुधाबी - आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमध्ये दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये रंगला आहे. केकेआरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे. चेन्नईन 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर केकेआरने 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत. प्ले ऑफ फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी केकेआरला आजच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या विजयी संघ कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सने संघात एक बदल केला आहे. त्यांनी ड्वेन ब्राव्होच्या जागेवर सॅम कुरेनला संघात स्थान दिलं आहे. ब्राव्होला अधिक वर्कलोडमुळे विश्रांती देण्यात आल्याचे धोनीने सांगितलं.
चेन्नई वि. कोलकाता हेड टू हेड आकडेवारी -
चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत आयपीएलमध्ये 23 सामने झाली आहे. यात धोनीच्या चेन्नई संघाचा पगडा भारी आहे. चेन्नईने 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता संघाला 8 सामन्यात विजय मिळवता आला आहे.