मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी एकमेकांसमोर आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत बंगळुरूने चारही सामने जिंकलेले आहेत, तर चेन्नईने गेल्या तीन सामन्यांत विजय मिळवून आपलीही गाडी रुळावर आणलेली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी मोईन अली आणि लुंगी एनगिडी यांच्या जागेवर ड्वेन ब्राव्हो आणि इम्रान ताहीर यांना अंतिम संघात स्थान दिलं आहे. दुसरीकडे बंगळुरू संघाने देखील दोन बदल केले आहेत. त्यांनी नवदीप सैनी आणि डॅनियल सॅम्स यांना संधी दिली आहे.
चेन्नई-बंगळुरू हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास चेन्नईचा पगडा भारी आहे. चेन्नईने १७ सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरूचा संघ ९ सामन्यात विजयी ठरला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ -