मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ तुफान फॉर्मात आहेत. यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात आतापर्यंत बंगळुरूने चारही सामने जिंकलेले आहेत, तर चेन्नईने गेल्या तीन सामन्यांत विजय मिळवून आपलीही गाडी रुळावर आणलेली आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात, याचीही उत्सुकता आजच्या सामन्यात असणार आहे.
चेन्नई-बंगळुरू हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास चेन्नईचा पगडा भारी आहे. चेन्नईने १७ सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरूचा संघ ९ सामन्यात विजयी ठरला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, नारायण जगदीसन, ऋतुराज गायकवाड़, के एम आसिफ, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, फाफ डू प्ले सिस, शार्दुल ठाकुर, मिशेल सँटनर, ड्वेन ब्रावो, लुंगी एनगिडी, सॅम कुरेन, रवींद्र जडेजा, इमरान ताहीर, रॉबिन उथप्पा, मोइन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, एम. हरिशंकर रेड्डी, के. भगत वर्मा, सी हर्ष निशांत, आर साई किशोर आणि जेसन बेहरेनडोर्फ.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, फिन एलेन, एबी डिव्हिलियर्स, पावन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल सॅम्स, युजवेंद्र चहल, अॅडम जम्पा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, कायले जेमीसन, डॅनियल क्रिश्चियन, सुयश प्रभुदेसाई आणि केएस भारत.
हेही वाचा -पाकच्या गोलंदाजांचा वेगवान बाऊंसर, हेल्मेटचे झाले दोन तुकडे उडाला गोंधळ, पाहा व्हिडिओ
हेही वाचा -झारखंडच्या शेतकऱ्याच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियंका चोप्राने केलं कौतूक