दुबई - आयपीएल 2021मधील 32वा सामना आज पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वात खेळणारी पंजाब गुणतालिकेत 7व्या तर संजू सॅमसनची राजस्थान 6व्या स्थानावर आहे. आजचा सामना दोन्ही संघाना प्ले ऑफ फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी महत्वाचा आहे.
एविन लुईस आणि लियान लिविंगस्टोन या स्फोटक फलंदाजाचा सामना अनुभवी ख्रिस गेल आणि कर्णधार केएल राहुलच्या रणणितीशी होईल. पण राजस्थान रॉयल्स संघाला जोस बटलरची नक्कीच कमतरता भासेल. पण लुईस संघात आल्याने त्याची फलंदाजी भक्कम झाली आहे. लिविंगस्टोन देखील शानदार फॉर्मात आहे. त्याने नुकतीच पार पडलेल्या द हंड्रेड स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. तो वेस्ट इंडिजचा एविन लुईससोबत सलामीला येऊ शकतो.
लुईस-लिविंगस्टोन जर भक्कम सलामी देण्यात यशस्वी ठरले. तर तो डाव संजू सॅमसन पुढे घेईन जाईल. अष्टपैलू ख्रिस मॉरिस देखील राजस्थान रॉयल्सचा हुकमी एक्का आहे. त्याने आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
पंजाबला ख्रिस गेल, केएल राहुल आणि मयांक अगरवाल यांच्याकडून चांगल्या सुरूवातीची आपेक्षा आहे. सोमवारी पंजाबने ख्रिस गेल नेटमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. गेलचा पंजाबसाठी हा 40वा सामना आहे. झाय रिचर्डसन आणि रिले मेरेडिथ यांनी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रातून माघार घेतली. यामुळे पंजाबची गोलंदाजी काहीशी दुबळी झाली आहे.
पंजाब-राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड -
पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात आतापर्यंत 22 सामने झाली आहेत. यात राजस्थानने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाबने 10 वेळा बाजी मारली आहे.