महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनाला हरवायला लसच आपल्याला मदत करेल, घरी पोहोचताच धवनने गाठलं लसीकरण केंद्र - कोरोना लसीकरण न्यूज

दिल्ली कॅपिटल्स संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन देखील आपल्या घरी पोहोचला आहे. घर गाठताच त्याने, तात्काळ कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्र गाठलं.

ipl-2021-after-suspension-of-ipl-shikhar-dhawan-took-no-time-in-taking-vaccine-lefty-opener-makes-appeal-to-fans
कोरोनाला हरवायला लसच आपल्याला मदत करेल, घरी पोहोचताच धवनने गाठलं लसीकरण केंद्र

By

Published : May 6, 2021, 5:01 PM IST

नवी दिल्ली -आयपीएलचा १४वा हंगाम अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्यानंतर भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन देखील आपल्या घरी पोहोचला आहे. घर गाठताच त्याने, तात्काळ कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्र गाठलं.

धवनने लस घेतानाचा फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे. फोटो शेअर करताना धवनने लिहले की, 'मी लस घेतली आहे. फ्रंटलाईन वर्करच्या कामाचे कौतूक करावे तितके कमी आहे. कृपा करून लस घेण्यापासून घाबरू नका. लवकरात लवकर लस घ्या. लसच आपल्याला कोरोनाला हरवायला मदत करेल.'

आशा आहे की, धवनन नंतर आणखी भारतीय खेळाडू लस घेण्यासाठी पुढे येतील. यामुळे युवांमध्ये लस घेण्याची प्रेरणा निर्माण होईल. दरम्यान, आयपीएलच्या चौदावा हंगाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने तात्काळ स्थिगित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत.

हेही वाचा -IPL २०२१ : मुंबई इंडियन्स परदेशी खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईट्सने मायदेशी पाठवणार

हेही वाचा -कॅप्टन असावा तर असा! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

ABOUT THE AUTHOR

...view details