चेन्नई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी सामना पार पडला. या सामन्यात बंगळुरू संघाने कोलकातावर ३८ धावांनी विजय मिळवला. बंगळुरूच्या विजयात ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनी आक्रमक वैयक्तिक अर्धशतके झळकावत मोलाची भूमिका निभावली. या दोघांमधील भागिदारीदरम्यानचा एक किस्सा डिव्हिलियर्सने सांगितला.
सामना संपल्यानंतर डिव्हिलियर्स चहलशी बोलताना म्हणाला की, 'ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी दरम्यान थकला होता. जेव्हा मी क्रीजवर गेलो, तेव्हा त्याने मला सांगितलं की, मी जास्त धावा पळू शकत नाही. पण मी दोन रन आणि तीन रन धावण्याचा धडाका लावला. तेव्हा मॅक्सवेल माझ्यावर रागावला होता.'
दरम्यान डिव्हिलियर्स डावाच्या १२ व्या षटकात फलंदाजीसाठी उतरला. तेव्हा संघाची धावसंख्या ३ बाद ९५ अशी होती. यावेळी मॅक्सवेल नाबाद ६० धावांवर खेळत होता. मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्स या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५३ धावांची भागिदारी केली.