अबुधाबी - तीन विजेतेपदे मिळवलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी यंदाचा आयपीएल हंगाम खराब ठरला. आज धोनीसेना पंजाबविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळत आहे. या सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान, डॅनी मॉरिसन यांनी धोनीला एक प्रश्न विचारला. धोनीचे दोन शब्दांचे उत्तर सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे.
मॉरिसन यांनी धोनीला विचारले, की चेन्नई सुपर किंग्जकडून हा तुझा अखेरचा सामना आहे का? त्यावर धोनीने 'डेफिनिटली नॉट (नक्कीच नाही)' अशा दोन शब्दात भन्नाट उत्तर दिले. धोनीचे हे शब्द सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. दुसरीकडे, धोनी पुढच्या वर्षी पुन्हा खेळणार असल्याने त्याचे चाहते नक्कीच सुखावले आहेत.