महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

संजू सॅमसन भारताचा पुढचा धोनी - शशी थरुर

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर संजूचे कौतुक करताना तो भारताचा पुढचा धोनी असेल, असे म्हटले आहे. शशी थरूर म्हणाले, ''राजस्थान रॉयल्सने नेत्रदीपक विजय नोंदविला. मी एका दशकापासून संजू सॅमसनला ओळखतो. जेव्हा तो १४ वर्षांचा होता, तेव्हा मी त्याला सांगितले होते, की तो आगामी एमएस धोनी होईल.''

Shashi tharoor calls sanju samson next ms dhoni
संजू सॅमसन भारताचा पुढचा धोनी - शशी थरुर

By

Published : Sep 28, 2020, 3:54 PM IST

नवी दिल्ली -किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२०च्या ९व्या सामन्यात राजस्थानने पंजाबवर चार गडी राखून शानदार विजय नोंदवला. ४२ चेंडूत ८५ धावा ठोकणाऱ्या संजू सॅमसनला सामनावीर पुरस्कार मिळाला. अशक्यप्राय वाटणारा विजय संजू सॅमसनच्या खेळीमुळे सोपा झाला, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही सॅमसनच्या खेळीबाबत ट्विट केले आहे.

शशी थरूर यांच्या ट्विटला गंभीरचे उत्तर

थरूर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर संजूचे कौतुक करताना तो भारताचा पुढचा धोनी असेल, असे म्हटले आहे. शशी थरूर म्हणाले, ''राजस्थान रॉयल्सने नेत्रदीपक विजय नोंदविला. मी एका दशकापासून संजू सॅमसनला ओळखतो. जेव्हा तो १४ वर्षांचा होता, तेव्हा मी त्याला सांगितले होते, की तो आगामी एमएस धोनी होईल. तो दिवस प्रत्यक्षात आला आहे. आयपीएलच्या दोन डावांमुळे तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, हे आपल्याला माहिती झाले आहे.

शशी थरुर यांच्या ट्विटला भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही उत्तर दिले आहे. 'त्याला कोणासारखेही बनण्याची गरज नाही. तो भारतीय क्रिकेटचा संजू म्हणून ओळखला जाईल.' शारजाहच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मयांक अग्रवालचे शतक आणि केएल राहुलचे अर्धशतक यांच्या जोरावर २२३ धावा जमवल्या. हे आव्हान राजस्थानने ४ गडी राखून पूर्ण केले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना रंगतदार ठरला. राजस्थानकडून संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि राहुल तेवतिया यांनी अर्धशतके झळकावली. पण राजस्थानच्या रॉयलच्या विजयात हीरो ठरला राहुल तेवतिया. त्याने प्रती षटक १४ धावांची गरज असताना अवघ्या १२ चेंडूत ४५ धावा केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details