दुबई - काल (सोमवारी) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी करत बंगळुरूवर विजय मिळवला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दिल्लीने 59 धावांनी मात केली. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १९७ धावांचे आव्हान बंगळुरूला पेलवले नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या इतर सर्व फलंदाजांनी दिल्लीच्या माऱ्यासमोर शरणागती पत्करली. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजी दरम्यान ऋषभ पंतने लगावलेला एक षटकार सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे.
ऋषभ पंतचा बेसबॉल स्टाईल षटकार! - ऋषभ पंत बेसबॉल स्टाईल षटकार न्यूज
क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. येणारा चेंडू वेळप्रसंगी कसा टोलवायचा याच्या अनेक निराळ्या पद्धती फलंदाजांनी शोधून काढल्या आहेत. आयपीएलमध्ये ऋषभ पंतने अनोख्या पद्धतीने बॅट फिरवत षटकार खेचला आहे.

ऋषभ पंत
मोहम्मद सिराजने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने १९वे षटक टाकले. डावाचा शेवट असल्याने दिल्लीचे फलंदाज आक्रमक धोरण घेतील याची सिराजला कल्पना होती. त्यावेळी सिराजचा सामना करण्यासाठी ऋषभ पंत होता. सिराजने टाकलेला षटकाचा पहिला चेंडू पंतच्या हेल्मेटजवळून गेला. नेमके त्याच वेळी पंतने अगदी बेसबॉल स्टाईलने बॅट फिरवत चेंडू सीमारेषेपार पोहचवला. पंतचा हा षटकार सध्या चर्चेचा विषय झाला आहे.