महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रिकी पाँटिंगला पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा - rishabh pant in ipl 2020

उद्या (२० सप्टेंबर) रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे. हा सामना दुबईच्या स्टेडियमवर रंगणार आहे. सामन्यापूर्वी, पाँटिंगला संघाबद्दल विचारले असता तो म्हणाला, ''आमच्याकडे खूप चांगली टीम आहे. गेल्या हंगामातही आम्ही चांगले खेळलो. आम्ही शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉइनिस आणि अ‍ॅलेक्स कॅरी यासारखे काही खेळाडू परदेशी फलंदाजही संघात समाविष्ट केले आहेत."

ricky ponting expects good performance from rishabh pant in ipl 2020
रिकी पाँटिंगला पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

By

Published : Sep 19, 2020, 9:04 PM IST

Updated : Sep 25, 2020, 6:00 PM IST

दुबई - दिल्ली कॅपिल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने युवा फलंदाज रिषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या आगमनामुळे संघाची फलंदाजी आणखी बळकट झाली असल्याचेही पाँटिंग म्हणाला.

उद्या (२० सप्टेंबर) रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे. हा सामना दुबईच्या स्टेडियमवर रंगणार आहे. सामन्यापूर्वी, पाँटिंगला संघाबद्दल विचारले असता तो म्हणाला, ''आमच्याकडे खूप चांगली टीम आहे. गेल्या हंगामातही आम्ही चांगले खेळलो. आम्ही शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉइनिस आणि अ‍ॅलेक्स कॅरी यासारखे काही खेळाडू परदेशी फलंदाजही संघात समाविष्ट केले आहेत."

पंत आणि रहाणे यांच्या संघातील भूमिकेविषयी पाँटिंग म्हणाला, ''पंतला आपली जबाबदारी माहित आहे. पंत चांगली कामगिरी करेल.'' पाँटिंग रहाणेबद्दल म्हणाला, "त्याची तयारी चांगली झाली आहे. टी-२० फलंदाजी सुधारण्यासाठी मी त्याच्यासोबत जवळून काम केले आहे.''

वेगवान गोलंदाजी विभाग आणि संघातील पर्यायांबद्दल पाँटिंग म्हणाला, '' "एनरिक नारजे हा आपल्यामध्ये आलेल्या सर्वात प्रभावी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो विविध प्रकारच्या गोलंदाजी करू शकतो. तसेच कगिसो रबाडा, इशांत शर्मा आणि मोहित शर्मा डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करू शकतात.''

Last Updated : Sep 25, 2020, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details