महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आधी विचित्र वाटत होतं, पण नंतर सवय झाली; विराट कोहली म्हणाला... - रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे विचित्र वाटते

उत्साह भरपूर असायचा, पण जेव्हा मी स्टेडियममध्ये प्रवेश करायचो, तेव्हा रिकामे स्टॅण्ड पाहून विचित्र वाटायचे. कित्येक दिवसांपासून रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्याची सवय नव्हती आहे. मात्र, मला आता याची हळूहळू सवय होत आहे.

विराट कोहली
विराट कोहली

By

Published : Nov 6, 2020, 9:08 PM IST

अबू धाबी - सुरुवातीला रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे विचित्र वाटत होते. पण, नंतर रिकाम्या स्टँण्डमध्ये खेळण्याची सवय झाली, असे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.

'स्टार स्पोर्ट्स' वाहिनीशी झालेल्या संभाषणावेळी कोहली म्हणाला, "सुरुवातीला चाहत्यांशिवाय स्टेडियममध्ये प्रवेश करणे विचित्र वाटत होते. उत्साह भरपूर असायचा, पण जेव्हा मी स्टेडियममध्ये प्रवेश करायचो, तेव्हा रिकामे स्टॅण्ड पाहून विचित्र वाटायचे. कित्येक दिवसांपासून रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्याची सवय नव्हती आहे. मात्र, मला आता याची हळूहळू सवय होत आहे.

स्पर्धेचा थरार अनुभवण्यास सुरुवात केली

कोहलीचा आरसीबीमधील सहकारी अब्राहम डिव्हिलियर्सनेही काही दिवसांपूर्वी अशीच गोष्ट सांगितली होती. गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या तुलनेत यंदाचे वातावरण पूर्णपणे बदलले आहे, असे डिव्हिलियर्स म्हणाला होता. स्पर्धा पुढे जात राहिली तस-तसे खेळाडूंनी या स्पर्धेचा थरार अनुभवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद लुटण्यास सुरुवात केली, असे कोहली म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details