नवी दिल्ली - दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी खेळल्या गेलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या ख्रिस जॉर्डनने शेवटच्या षटकांत शानदार गोलंदाजी केली. या कामगिरीमुळे पंजाबने हैदराबादला १२ धावांनी नमवले. या सामन्यानंतर पंजाबने जोफ्रा आर्चरचे ६ वर्षांपूर्वीचे ट्विट शेअर केले.
'हा' संघ जिंकणार आयपीएल, जोफ्रा आर्चरचे ६ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल! - archer latest viral tweet
''यावेळी आयपीएलचे विजेतेपद किंग्ज इलेव्हन पंजाब जिंकणार'', असे २०१४मध्ये केलेल्या ट्विटमध्ये जोफ्राने लिहिले आहे. यापूर्वीही जोफ्रा आर्चरचे अनेक ट्विट सत्यात उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
''यावेळी आयपीएलचे विजेतेपद किंग्ज इलेव्हन पंजाब जिंकणार'', असे २०१४मध्ये केलेल्या ट्विटमध्ये जोफ्राने लिहिले आहे. यापूर्वीही जोफ्रा आर्चरचे अनेक ट्विट सत्यात उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
मागील वर्षी आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान, आर्चरचे जुने ट्विट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. २०१४मध्ये आर्चरने पाऊस आणि सुपर ओव्हरसंबंधी ट्विट केले होते. आर्चरने इंग्लंडकडून ११ कसोटी, १४ एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. ज्यात त्याने ६३ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये आर्चर राजस्थान संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे.