महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बूम-बूम बुमराहचा जलवा, आयपीएलमध्ये रचला आणखी एक नवा विक्रम - आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक बळी मिळवण्याची कामगिरी

बुमराह आत्तापर्यंत मुंबईच्या गोलंदाजितील हुकमी एक्का ठरला आहे. त्याच्या गोलंदाजीवर फटके लगावणे फलंदाजाला मुश्कील होते. त्याचे अचूक यॉर्कर्स आणि बॉउन्सर चेंडू खेळताना फलंदाज गोंधळून जातात. दिल्ली विरूद्धच्या सामन्यात त्याने शिखर धवनला अफलातून यॉर्करवर त्रिफळाचित करत तंबूचा रस्ता दाखवला.

बूम-बूम बुमराहचा जलवा
बूम-बूम बुमराहचा जलवा

By

Published : Nov 6, 2020, 4:51 PM IST

Updated : Nov 6, 2020, 6:21 PM IST

दुबई- मुंबई इंडियन्सच्या संघाला आयपीएल २०२० च्या जेते पदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मुंबईच्या संघात जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहची कामगिरी सर्वात वरचढ ठरत आहे. बुमराह अतिशय उत्कृष्ठ लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करत असून त्याचा यॉर्कर आणि बॉउन्सर चेंडू तर खेळताना अनेक फलंदाजांची भंबेरी उडते. कालच्या सामन्यात त्याने १४ धावांमध्ये ४ बळी घेत दिल्लीच्या संघाचे मनसुबे उधळून लावले. या कामगिरीबरोबरच त्याच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

हंगामात आत्तापर्यंत २७ बळी

भारतीय गोलंदाज म्हणून आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक बळी मिळवण्याची कामगिरी त्याने केली आहे. या हंगामात त्याने आत्तापर्यंत सर्वाधिक २७ बळी मिळवले आहेत. यापूर्वी २०१७ च्या आयपीएल हंगामात भुवनेश्वर कुमारने २६ गडी बाद केले होते. अजून अंतिम सामन्यात मुंबईचा संघ खेळणार असल्याने बुमराहची बळी संख्या आणखीन वाढू शकते.

बुमराह आत्तापर्यंत मुंबईच्या गोलंदाजितील हुकमी एक्का ठरला आहे. त्याच्या गोलंदाजीवर फटके लगावणे फलंदाजाला मुश्कील होते. त्याचे अचूक यॉर्कर्स आणि बॉउन्सर चेंडू खेळताना फलंदाज गोंधळून जातात. दिल्ली विरूद्धच्या सामन्यात त्याने शिखर धवनला अफलातून यॉर्करवर त्रिफळाचित करत तंबूचा रस्ता दाखवला.

हेही वाचा -सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात आज 'एलिमिनेटर' लढत

Last Updated : Nov 6, 2020, 6:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details