अबूधाबी - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जात असून तो सध्या रंगतदार स्थितीमध्ये पोहचला आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या दोन संघामध्ये आज सामना होणार आहे. आज शेख झाएद स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो अवस्थेतील आहे.
पंजाबने आतापर्यंत १२ सामने खेळले असून यात त्यांनी ६ विजय मिळवले असून ६ पराभव स्विकारले आहेत. त्यामुळे १२ गुणांसह पंजाब गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थानने १२ सामने खेळले असून ५विजय व ७ पराभव स्विकारले आहेत. १० गुणांसह राजस्थान सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा अद्याप कायम आहेत.
पंजाबने मागील पाच सामन्यांमध्ये चांगला खेळ करत सलग पाच विजय मिळवले आहेत. त्यांनी राहिलेले दोन्ही सामने जिंकले तर त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. राजस्थानसाठी मात्र, प्लेऑफचा मार्ग काहीसा कठीण असणार आहे. त्यांनाही दोन्ही सामने जिंकण्याव्यतिरिक्त पंजाब, कोलकाता आणि हैदराबादच्या पराभवांच्या भरोश्यावर रहावे लागणार आहे.
संभाव्य संघ -