महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई आणि मुंबईची अटीतटीची लढाई - चेन्नई सुपर किंग्ज संघ

चेन्नईचा शुक्रवारी मुंबईशी सामना होणार आहे. चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी आता उर्वरित चारही सामने मोठ्या रनरेटने जिंकणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, मुंबई इंडियन्सचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळजवळ निश्चित आहे

चेन्नई-मुंबई
चेन्नई-मुंबई

By

Published : Oct 23, 2020, 12:50 PM IST

Updated : Oct 23, 2020, 1:56 PM IST

शारजाह - चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा 13 वा हंगाम जवळजवळ संपला आहे. या मोसमात धोनीच्या नेतृत्वाखालील तीन वेळच्या चॅम्पियन चेन्नईची कामगिरी खराब झाली आहे. सहा गुणांसह शीर्षस्थानी असलेल्या चेन्नईचा आज (शुक्रवारी) मुंबईशी शारजाहमध्ये 7.30 वा. सामना होणार आहे.

चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी आता उर्वरित चारही सामने मोठ्या रनरेटने जिंकणे गरजेचे आहे. तरीही, पुढील फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी संघाला नशिबाची आवश्यकता असेल. त्याचबरोबर, मुंबई इंडियन्सचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळजवळ निश्चित आहे आणि आता संघ उर्वरित सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखण्यास प्रयत्नशील असेल. अशा परिस्थितीत आज दोन्ही संघांमधील सामन्यात चुरस पाहायला मिळेल.

चेन्नई सुपर किंग्ज संघ-

फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, एन. जगदीशन, रवींद्र जडेजा, जोश हेजलवुड, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, इम्रान ताहिर

मुंबई इंडियन्स संघ-

क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाइल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

Last Updated : Oct 23, 2020, 1:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details