महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वॉर्नरने ११ व्यांदा जिंकली नाणेफेक; ११ नंबरचा आयपीएल चषकाशी आहे 'जवळ'चा संबंध - हैदराबादच्या कर्णधार डेव्हिड वॉर्नर

११ वेळा नाणेफक जिंकणाऱ्या कर्णधाराचा संघ दोन वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. यापूर्वी रोहित शर्माने २०१७ मध्ये तर महेंद्रसिंह धोनीने २०१८ मध्ये ११ वेळा नाणेफेक जिंकण्याची कामगिरी केली होती आणि मजेशीर गोष्ट म्हणजे त्या दोघांनी त्यावर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.

अबू धाबी
अबू धाबी

By

Published : Nov 6, 2020, 8:18 PM IST

अबू धाबी - येथील शेख जाएद स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या या १३ व्या हंगामात वॉर्नरने ११ वेळा नाणेफक जिंकली आहे. ११ वेळा नाणेफक जिंकण्याचा एक विशेष योगायोग आहे.

११ वेळा नाणेफक जिंकणाऱ्या कर्णधाराचा संघ दोन वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. यापूर्वी रोहित शर्माने २०१७ मध्ये तर महेंद्रसिंह धोनीने २०१८ मध्ये ११ वेळा नाणेफेक जिंकण्याची कामगिरी केली होती आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे त्या दोघांनी त्यावर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.

आजचा सामना करो या मरोचा

दोन्ही संघांसाठी आजचा सामना करो या मरोचा आहे. आज जिंकणाऱ्या संघाचा सामना क्वालिफायर -२ मध्ये दिल्ली कॅपिटलशी होणार आहे. क्वालिफायर -१ मध्ये दिल्लीला हरवून मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबईचा संघ पहिला आणि दिल्ली दुसर्‍या क्रमांकावर आहे. म्हणूनच या दोघांना क्वालिफायर -1 चा सामना करावा लागला. आज वॉर्नरने आपल्या संघात बदल केला आहे. दुखापतीमुळे वृध्दिमान साहा खेळत नसून त्याच्या जागी श्रीवस्त गोस्वामी संघात आहे.

दुसरीकडे कोहलीने तीन बदल केले आहेत. दुखापतीमुळे ख्रिस मॉरिस खेळत नाही. याशिवाय जोसुआ फिलिप आणि शाहबाज अहमदही संघात नाहीत. या तिघांच्या जागी अ‍ॅरोन फिंच, एजडम झांपा आणि नवदीप सैनी खेळत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details