अबुधाबी - आयपीएलमध्ये शुक्रवारी ५०वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघात पार पडला. यात राजस्थानने पंजाबची विजयी घोडदौड रोखली. पंजाबकडून आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने ९९ धावांची खेळी केली. मात्र, राजस्थानने पंजाबवर सात गड्यांनी सहज विजय नोंदवला. पंजाबला मात खावी लागली असली, तरी गेलच्या एका मोठ्या विक्रमाने त्याचे चाहते सुखावले आहेत.
गेलने या सामन्यात ६३ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांसह ९९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने टी-२० क्रिकेट प्रकारात १००० षटकार मारण्याचा कारनामाही केला. असा कारनामा करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.