नवी दिल्ली -यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन भन्नाट फॉर्मात आहे. रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात संजूने ४२ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत संजूने ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. त्याच्या खेळीमुळे राजस्थानसाठी अशक्यप्राय वाटणारा विजय सोपा झाला. सातत्यपूर्ण खेळीमुळे महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना सॅमसनविषयी एक प्रश्न पडला आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन संजूबद्दल एक प्रश्न विचारला आहे. सॅमसन नावाचा सभ्य गृहस्थ नक्की जेवणात काय खातो यासंदर्भातील माहिती मला कोणी देऊ शकेल का?, असा प्रश्न महिंद्रा यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.