दुबई -यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना २० कोटी लोकांनी पाहिला असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी सांगितले. गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना पार पडला. शहा यांच्या मते, इतर कोणत्याही देशातील कोणत्याही खेळाचा उद्घाटनाचा सामना पाहणारे हे सर्वाधिक लोक आहेत.
शनिवारी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा सलामीचा सामना खेळला गेला, ज्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने चार वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला.