महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे क्रिकेट सोडण्याच्या विचारात होतो - नीशम - world cup

नीशम याची विश्वचषकाच्या संघात निवड झाल्याने तो भलताच खूश आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. नीशम यास २०१५ च्या विश्वचषकात स्थान देण्यात आले नाही.

जेम्स नीशम

By

Published : Apr 6, 2019, 2:30 AM IST

वेलिंग्टन - अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशम याची न्यूझीलंडने विश्वचषकाच्या संघात निवड झाली आहे. ही निवड जणू त्याला स्वप्नासारखी भासत आहे. कारण गेल्या १८ महिन्यांपासून तो खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे बाहेर पडल्याने निवृत्तीचा विचार करत होता. त्यानंतर त्याने मानसोपचार तज्ज्ञाकडून त्याला सल्ला घ्यावा लागला. त्यानंतर त्याने पुन्हा क्रिकेटमध्ये येण्याचे ठरविले.

नीशम याची विश्वचषकाच्या संघात निवड झाल्याने तो भलताच खूश आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. नीशम यास २०१५ च्या विश्वचषकात स्थान देण्यात आले नाही. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघात संधी दिली गेली नाही.

नीशम याने न्यूझीलंड क्रिकेट संघाचे सीईओ हीथ मिल्स यांच्याकडे निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मिल्स यांनी नीशम यास क्रिकेटमध्ये छोटा ब्रेक घेऊन परत येण्यास सांगितले होते.

संघात निवड झाल्यानंतर नीशमने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला मला खूप कामी आला. त्यांच्या सल्ल्यानंतर मला खूपच फरक जाणवत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने त्याची बेस प्राईज ७५ लाख रुपये ठेवली होती. पण कोणत्याही संघाने त्याला घेण्यात स्वारस्य दाखविले नाही.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details