महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2019: मुंबई-चेन्नईत रंगणार अंतिम सामना, कोण मारणार बाजी? - match

आयपीएलच्या इतिहासातील दोन यशस्वी संघ आज जेतेपदाचा सामना खेळणार असल्याने क्रिकेटप्रेमींना या सामन्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबई आणि चेन्नईत रंगणार अंतिम सामना

By

Published : May 12, 2019, 8:11 AM IST

Updated : May 12, 2019, 10:27 AM IST

मुंबई- गेल्या दीड महिन्यांपासून क्रिकेटरसिकांसाठी मेजवाणी ठरलेल्या आयपीएलच्या या सीझनचा आज शेवटचा दिवस आहे. आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. जेतेपदासाठी चेन्नईला मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे.

आयपीएलच्या इतिहासातील दोन यशस्वी संघ आज जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. क्रिकेटप्रेमींची सामन्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईने आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चारपैकी तीन अंतिम फेरीचे सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे यांपैकी २०१३ आणि २०१५ चे सामने मुंबईने चेन्नईविरुद्ध खेळताना जिंकले आहेत.

आयपीएलच्या या अंतिम सामन्यावेळी प्रेक्षकांना अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांनाही पाहाता येणार आहे. सामन्यादरम्यान सलमान आणि कॅटरिना आपल्या आगामी भारत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टूडिओमधून एक लाईव्ह सेगंमेंट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.


हे खेळाडू खेळणार अंतिम सामना -

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), इशन किशन, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंड्या, मिचेल मॅक्क्लिनॅघन/जयंत यादव, राहुल चहर, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमरा

चेन्नई सुपर किंग्ज: शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, ध्रुव शौरी/ मुरली विजय, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, हरभजन सिंग, इम्रान ताहीर.

Last Updated : May 12, 2019, 10:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details