UPDATE -
भारताविरुद्धची तीन सामन्याची टी २० मालिका श्रीलंकेने २-१ ने जिंकली. श्रीलंकेन ७ गडी राखून सामना जिंकला. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाला ८२ धावांवर रोखण्यात श्रीलंकन संघाला यश आलं. श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज तग धरू शकले नाही. ८ गडी गमवून भारताने ८१ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी ८२ धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. श्रीलंकेनं हे आव्हान ३ गमवून सहज गाठलं.
कोलंबो - भारत विरुध्द श्रीलंका यांच्यातील तीन सामन्याच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना आज श्रीलंकेतील कोलंबो शहरात खेळला जाणार आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकून आपले आव्हान कायम राखले आहे. आजचा सामना मालिका कोण जिंकणार याचा निकाल देणारा आहे. त्यामुळे दोन्हीं संघाकडून चुरशीचा खेळ अपेक्षित आहे.
दोन्ही संघातील खेळाडू पुढील प्रमाणे -
भारत: शिखर धवन (कप्तान), ऋतुराज गायकवाड़, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, संदिप वारियर, चेतन साकरिया, वरुण चक्रवर्ती.
श्रीलंका: अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर),सदीरा समरविक्रमा, दसुन शनाका (कप्तान), धनंजय डिसिल्वा, रमेश मेंडिस, वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, अकीला धनंजय, दुष्मंथा चमीरा.
भारताने पहिल्यांदा खेळताना 20 षटकात केवळा 81 धावा केल्या
भारताने नेणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण अपेक्षित खेळी मैदानावर पाहायला मिळाली नाही. कुलदिप यादव नाबाद राहून 23 धावा काढल्या. आज सर्वात जास्त त्यानेच धावा केल्या. भारताने 20 षटकामध्ये केवळ 81 धावा केल्या असून एक सोपे लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवण्यात आले आहे. भारताच्यावतीने ऋतुराज गायकवाडने 14 धावा आणि भुवनेश्वर कुमारने 16 धावा काढल्या. बाकीच्या बाद झालेल्या 6 खेळाडूंना दोन आकडी धाव संख्याही गाठता आली नाही. यामध्ये शिखर धवन, संजू सॅमसन आणि वरुण चक्रवर्ती यांनी आपले खातेही उघडलेही.