महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेने नांगी टाकली, पहिल्या डावात भारताला मोठी आघाडी -

सामन्याचा तिसरा दिवस हा भारतीय गोलंदाजांनी गाजवला आहे. दिवसाच्या सुरुवातील भारतीय संघाचा डाव ३ बाद २७२ वरून सुरू झाला आणि अवघ्या काही तासातच ३२७ धावांवर संपला. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला आणि दक्षिण आफ्रिकेला धोबी पछाड दिला.

पहिल्या डावात भारताला मोठी आघाडी
पहिल्या डावात भारताला मोठी आघाडी

By

Published : Dec 28, 2021, 11:01 PM IST

सेंच्युरियन : सामन्याचा तिसरा दिवस हा भारतीय गोलंदाजांनी गाजवला आहे. दिवसाच्या सुरुवातील भारतीय संघाचा डाव ३ बाद २७२ वरून सुरू झाला आणि अवघ्या काही तासातच ३२७ धावांवर संपला. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला आणि दक्षिण आफ्रिकेला धोबी पछाड दिला. मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ गारद केला. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांवर आटोपला.

भारतीय संघाला पहिल्या डावात १३० धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ३२ अशी अवस्था केली होती, मात्र तेम्बा बवुमाने ५२ धावांची दमदार खेळी करीत संघाला सावरले. बवुमाला मोहम्मद शमीने बाद केले आणि त्यांची ७ बाद १४४ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर कागिसो रबाडाने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत चांगली झुंज दिली आणि संघाला १९७ धावांचा पल्ला गाठून दिला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. याआधी भारतीय संघाने ३२७ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये केएल राहुलने भारतासाठी या डावात शतक झळकावले. राहुलने 260 चेंडूत 123 धावा केल्या.त्यानंतर मयंक अग्रवालने 60 धावा केल्या, तर कोहलीने 35 धावा जोडल्या. रहाणेने 48 धावा केल्या मात्र त्याचे अर्धशतक 2 धावांनी हुकले. शेवटी, बुमराहने 2 चौकार मारले, यात त्याने 14 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीने 6 आणि रबाडाने 3 बळी घेतले. या दोघांशिवाय अन्य कोणताही गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी होऊ शकला नाही.

हेही वाचा - Ganguly Hospitalised : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली कोविड पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details