नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टी-20 नंतर एकदिवसीय कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वनडे मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असेल. त्याची अधिकृत घोषणाही या दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या घोषणेदरम्यानच होऊ शकते.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शर्मा, शमी, शर्मा उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.
बऱ्याच काळापासून ज्याचा अंदाज लावला जात होता, तो अखेर खरा ठरला आहे. विराट कोहली आता फक्त कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटची जबाबदारी स्वीकारणारा रोहित शर्मा आता एकदिवसीय संघाचाही कर्णधार बनला आहे. म्हणजेच आता टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 50 षटकांच्या विश्वचषकासाठी सज्ज असेल.
राहुल चहर, शुबमन गिल, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात सहभागी झालेले नाहीत. तर नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नागवासवाला यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.