हैदराबाद: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवशी 3 बाद 272 धावा केल्या होत्या. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. केएल राहुलच्या शतकामुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे.
ज्याची भीती वाटत होती तेच झालं. मुसळधार पावसामुळे मैदान ओले झाले होते, त्यामुळे पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी, खेळ त्याच्या नियोजित वेळेला (भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता) सुरू होईल. तिसऱ्या सत्रात अर्धा तास अतिरिक्त खेळ असेल.
पहिल्या दिवशी बाद झालेल्या फलंदाजांमध्ये भारताकडून मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे होते. मयंक अग्रवालने 60 धावा केल्या. पुजाराला लुंगी एनगिडीने गोल्डन डक केले. लुंगी एनगिडीनेही विराट कोहलीचीही विकेट घेतली.
स्थानिक हवामान खात्यानुसार, पुढील दोन दिवस सेंच्युरियनमध्ये हवामान स्वच्छ राहील. अशा स्थितीत पुढील काही दिवस ९० षटकांऐवजी ९८ षटके पाहायला मिळू शकतात. मात्र, पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक तीन बळी घेतले. टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारायची आहे.
हेही वाचा -Harbhajan Singh Retirement : फिरकीपटू हरभजन सिंगची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती