जोहान्सबर्ग:भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेले. चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्या अगोदर पावसाला सुरुवात झाली होती. पावसाची लंच ब्रेक पर्यंत बॅटींग सुरु होती. तसेच पावसामुळे आज चौथ्या दिवसाचा खेळ होण्याची शक्यता धूसर आहे.
INDvSA 2nd Test : चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे गेले वाया - भारत आणि दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला पावसामुळे विलंब ( Rain delays start of fourth day's play) झाला आहे. चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेले. दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी 122 धावांची आवश्यकता (South Africa need 122 runs to win ) आहे.
![INDvSA 2nd Test : चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे गेले वाया INDvSA 2nd Test](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14112100-thumbnail-3x2-bcci.jpg)
INDvSA 2nd Test
काल भारताने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2 बाद 118 धावा केल्या. अशा स्थितीत त्यांना विजयासाठी 122 धावांची गरज आहे. तर भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून 8 फलंदाज बाद करावे लागतील. यजमान कर्णधार डीन एल्गर 46 आणि रायसी व्हॅन डर डुसेन 11 धावांच्या वैयक्तिक धावांवर नाबाद आहेत.
Last Updated : Jan 6, 2022, 5:27 PM IST