मुंबई- मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या क्रिकेटकसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी न्यूझीलंडच्या दोन भारतीय खेळाडूंनी प्रेक्षकांची मने जिंकली. एजाज पटेलने पहिल्या डावात 10 गडी मिळवण्याचा विश्वविक्रम साधला तर रचिन रविंद्रने दुसऱ्या डावात 2 बळी घेत 18 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने या दोनही न्यूझीलंड खेळाडूंचे अभिनंदन केले.
अश्विनने ट्विट केलेला एक फोटो सध्या खूप चर्चेचा विषय ठरलाय. त्याने भारतीय अक्षर पटेलसोबत एजाज पटेल आणि रविंद्र जडेजासोबत रविंद्र जडेजा यांचा पाठमोरा एक फोटो क्लिक केलाय. प्रत्येकाच्या जर्सीवर त्यांची नावे लिहिली आहेत. त्यामुळे "अक्षर * पटेल * रविंद्र * जडेजा" अशी जर्सीवरील नावे लक्ष वेधून घेतात. एकाचे नाव आणि एकाचे आडनाव असलेले खेळाडू भारतीय संघातही असल्याचा निव्वळ योगायोग या सामन्यात पाहायला मिळाला. अश्विनने या चार खेळाडूंना त्यांच्या नावाच्या क्रमानुसार उभे करून एक फोटो क्लिक केला, ज्याची सध्या चर्चा आहे.