महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs NZ 1st Test : न्यूझीलंडच्या सलामीवीरांची नाबाद अर्धशतके, भारताला चोख प्रत्युत्तर

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा डाव 345 धावांवर संपला. कसोटी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने १०५ धावांची शतकी खेळी व सलामीवीर शुभमन गिलच्या अर्धशतकाने भारताच्या संघाच्या खेळीला ही धावसंख्या गाठता आली. न्यूझीलंडने एकही गडी न गमवता १२९ जमवून भारताला चोख प्रत्यूत्तर दिले आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड
भारत विरुद्ध न्यूझीलंड

By

Published : Nov 26, 2021, 6:46 PM IST

कानपूरात सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस पाहुण्या संघासाठी उत्तम ठरला. न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाच्याअखेर ५७ षटकात बिनबाद १२९ जमवून भारताला चोख प्रत्यूत्तर दिले आहे. न्यूझीलंडचा संघ अजून २१६ धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग या जोडीने जबरदस्त सुरुवात केली. त्या्गोदर, लंचनंतर भारतीय संघाचा पहिला डाव १११.१ षटकात ३४५ धावांवर संपला. या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात श्रेयस अय्यरने १०५ धावांची शतकी खेळी करुन वाहवा मिळवली. तर सलामीला आलेल्या शुबमन गिलने ५२ धावांची लक्षवेधी खेळी केली. न्यूझीलंड संघाचा गोलंदाज टिम साऊदीने निम्मा संघ गारद करुन दमदार प्रदर्शन केले.

दोन्ही संघांतील खेळाडू

भारत – अजिंक्य रहाणे (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि उमेश यादव.

न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर) , रचिन रवींद्र, टिम साऊदी, एजाज पटेल, काइल जेमीसन, विल सोमरविले.

हेही वाचा - Gautam Gambhir : गौतम गंभीरला ठार मारण्याची आईएसआईएसकडून धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details