लंडन -लॉर्ड्सवर भारताचा इंग्लंडविरुद्ध (Indi vs England) 151 धावांनी विजय झाला आहे. यावेळी मोहम्मद शमी, केएल राहुलची निर्णयाक खेळी झाली आहे.
सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मजबूत खेळ खेळला. भारताकडून मोहम्मद सिराजने 4, इशांतने 3 तर मोहम्मद शमीने 1 बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने इंग्लंडसमोर 272 धावांचे आव्हान ठेवले होते. ते इंग्लंड पूर्ण करू शकला नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळवण्यात येत असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ६ गडी बाद १८१ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी सकाळी ऋषभ पंत (२२) लवकर बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते. तेव्हा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी उभारली. मोहम्मद शमीने दमदार खेळी केली. त्याने नाबाद 56 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह 34 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव 298 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य मिळाले होते. ते आव्हान इंग्लंड पूर्ण करू शकला नाही.