हैदराबाद - भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने ट्विटरच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 23 वर्षांच्या या प्रवासाला अलविदा म्हणत हरभजन सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
हरभजन म्हणाला, "सर्व चांगल्या गोष्टींचा अंत होत असतो आणि आज मी आयुष्यातील सर्व काही दिले आहे त्या माझ्या 23 वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा करीत आहे. मला मदत करणाऱ्या आणि माझा प्रवास आणखी सुंदर आणि संस्मरणीय बनवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो."
हरभजनने खेळलेल्या एकूण 103 कसोटी सामन्यांमध्ये 417 कसोटी विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, त्याने भारतासाठी 236 एकदिवसीय सामने खेळले आहेत, यात तो 269 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. 28 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत.
हरभजनने भारतासाठी फार काळापासून आंतरराष्ट्रीय मैदानावर पाऊल ठेवले नाही. त्याने 1998 मध्ये शारजाह येथे न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले होते, तर 2016 मध्ये ढाका येथे त्याने देशासाठी शेवटचा सामना यूएई ( UAE ) विरुद्ध खेळला.
हेही वाचा - आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा ४ ३ असा पराभव करत कांस्यपदक मिळवले