नवी दिल्ली- आयसीसी टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची जर्सी आज रिलिज करण्यात आली. पाच खेळाडूंसह या जर्सीचा फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यापूर्वीच्या तुलनेत ही जर्सी जरा भडक निळ्या रंगाची आहे. तसेच तिला आणखी स्टायलिश लुक देण्यात आला आहे.
टीम इंडियाला मिळाली नवी जर्सी, स्टायलिश लुकसह रंगात आहे जरा बदल - Team India in T20 World Cup
कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केएल राहूल, रविंद्र जडेजा आणि फास्ट बॉलर जसप्रील बुमराह यांच्या फोटोसह ही जर्सी रिलिज करण्यात आली. १७ ऑक्टोबरपासून हा वर्ल्डकप सुरु होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत आहे. २४ ऑक्टोबर रोजी हा सामना होणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी दुसरा सामना होणार आहे. पहिले दोन्ही सामने दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत. तिसरा सामना अबुधाबी येथे होणार आहे. हा सामना ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतरच्या दोन लढती दुबई आणि शाहजहा येथे होणार आहेत.

यासंदर्भात बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाला, की टीम इंडियाला केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून चाहत्यांचा पाठिंबा मिळतो. या जर्सीच्या माध्यमातून चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही.