नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा ( Indian squad announced for Zimbabwe tour ) केली आहे. पुन्हा एकदा विराट कोहलीचे नाव संघात समाविष्ट नाही, तर नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाचाही समावेश नाही. म्हणजेच या तिन्ही दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे शिखर धवनच्या हाती भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली ( Shikhar Dhawan has responsibility of captaincy ) आहे. त्यामुळे तो पुन्हा नेतृत्व करताना दिसेल.
शिखर धवनने वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद काही दिवसापूर्वीच भूषवले होते. त्या मालिकेत टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवताना वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप दिला होता. या दौऱ्यासाठी विराट कोहलीचा टीम इंडियात समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा होती, मात्र निवडकर्त्यांनी त्याला विश्रांती देणे योग्य मानले ( Virat Kohli dropped from the team ). मात्र, याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. विंडीज दौऱ्यावरही कोहलीला एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळाले नव्हते. तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा भाग होता, पण फलंदाजीत तो पूर्णपणे अपयशी ठरला होता.
2019 मध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या माजी कर्णधाराच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले ( Virat Kohli form constant question mark ) जात होते. 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी तर त्याला संघातून वगळावे असे म्हटले होते. तो पहिल्यांदा देशांतर्गत क्रिकेट खेळला आणि जर त्याने चांगली कामगिरी केली, तर त्याचा संघात समावेश करावा, असे म्हणाले होते. कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांनी मात्र कोहलीची पाठराखण केली.