केपटाऊन :न्यूलँड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या ( Third Test at Newlands ) पहिल्या दिवसाचा खेळ मंगळवारी संपला. भारताचा पहिला डाव 223 धावांवर आटोपला आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावाल सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेल संपेपर्यंत 8 षटकांत एक गडी गमावून 17 धावा केल्या आहेत. त्यामुळे हा संघ अजूनही 206 धावांनी भारताच्या पिछाडीवर आहे. भारताच्या पहिल्या डावात 223 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कारण जसप्रीत बुमराहने फॉर्मात असलेला सलामीवीर कर्णधार डीन एल्गरला ( Captain Dean Elgar ) (3) लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
यानंतर नाईटवॉचमन म्हणून आलेल्या केशव महाराज आणि एडन मार्कराम यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय वेगवान गोलंदाजांचा सामना केला. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी एक चौकार मारला. त्यानंतर आफ्रिकन संघाने आठ षटकांत एक गडी गमावून १७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये मार्कराम (8) आणि महाराज (6) धावा करुन क्रीजवर उपस्थित आहेत.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ पहिल्या डावात 223 धावांत सर्वबाद झाला. कारण शेवटच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. त्यांनी भारताच्या सहा विकेट्स केवळ 82 धावांतच (India lost six wickets for 82 runs ) घेतल्या. ज्यामुळे भारताला 77.3 षटकांत 223 धावा करता आल्या.
चहापानानंतर भारताच्या 141/4 धावसंख्येवरुन पुढे खेळताना कर्णधार विराट कोहली आणि पंत काही काळ आफ्रिकन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. यावेळी त्यांनी काही चांगले शॉट्स देखील लगावले. मात्र यानंतर जेन्सनने रिषभ पंतला 27 धावांवर कीगन पीटरसनकडे झेल देण्यास भाग पाडत बाद केले. त्यामुळे कोहली आणि पंत यांच्यातील शानदार भागीदारी तुटली. या दोघांमध्ये 113 चेंडूत 51 धावांची भागीदारी झाली होती. दरम्यान, आफ्रिकन गोलंदाजांचा सामना करताना कर्णधार कोहलीने ( Virat Kohli half century ) एकट्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर कोहलीनेही जेन्सनच्या याच षटकात दोन चौकार लगावत संघाला वेगवान वाट करून दिली. त्याचवेळी दुसऱ्या टोकाकडून भारताच्या विकेट पडत राहिल्या.
भारताचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. आर. अश्विन (2), शार्दुल ठाकूर (12), जसप्रीत बुमराह (0), विराट कोहली (79) आणि मोहम्मद शमी (7) यांनी धावा केल्या. तर उमेश यादवने 4 धावा करुन नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी जेन्सेनने तीन, तर डुआन ऑलिव्हर, लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.