मुंबई - भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या या मालिकेतील सर्व एकदिवसीय सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची माहिती दिली.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे चेअरमन अर्जुन डी सिल्वा यांनी सांगितलं की, 'संपूर्ण मालिका एकाच ठिकाणी करण्याची आमची योजना आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवरच सर्व सामने खेळवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.'
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ ५ जुलैला श्रीलंकेत दाखल होणार आहे. यानंतर एक आठवडाभर खेळाडू क्वारंटाईन राहतील. त्यानंतर उभय संघातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला १३ जुलैपासून सुरूवात होईल. ही मालिका संपल्यानंतर २२ जुलैपासून उभय संघात टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा -इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची भारताला चांगली संधी - राहुल द्रविड
हेही वाचा -क्रिकेटच्या मैदानातून राजकारणात एन्ट्री, ममता बॅनर्जींच्या मंत्रीमंडळात आता राज्यमंत्री