महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Sri Lanka vs India, 3rd ODI : श्रीलंकेचा तीन गडी राखून भारतावर विजय; - श्रीलंकेची प्रभावी गोलंदाजी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 226 धावांचे आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले आहे. हा सामना श्रीलंका राखण्यात यशस्वी होते की भारत 3-0 अशी मालिका जिंकणार याचा फैसला कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर सुरू आहे.

Sri Lanka vs India, 3rd ODI
भारताचे श्रीलंकेसमोर ...धावाचे आव्हान

By

Published : Jul 23, 2021, 8:09 PM IST

Updated : Jul 23, 2021, 11:41 PM IST

भारत -श्रीलंका यांच्यातील तिसरा आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 225 धावा केल्या आहेत. श्रीलंकेला 226 धावांचे आव्हान मिळाले होते. नव्या दमाचे 5 खेळाडू भारताचे पहिल्यांदा प्रतिनिधीत्व करीत होता. अशा परिस्थितीत भारताने सामना पराभूत झाला असला तरी मालिका भारताने यापूर्वीच जिंकली आहे.

पावसामुळे व्यत्यय आल्याने सामना 47 षटकांचा करण्यात आला आहे. श्रीलंकेच्या विजयात सिंहाचा वाटा असलेल्या अविष्का फर्नांडोने तडाखेबंद 76 धावा काढल्या. श्रीलंकेला 47 षटकांमध्ये 227 धावा करण्याचे लक्ष्य होते. श्रीलंकेने 39 षटकांमध्ये 7 गडी गमावून विजय मिळविला आहे.

आज भारताने नाणेपेक जिंकून पहिल्यादा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाचे तिसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये पाच नवे खेळाडू पदार्पण करीत आहेत. नितीश राणा, राहुल चाहर, चेतन सकारिया, कृष्‍णप्‍पा गौतम आमि संजू सॅमसन अशी या खेळाडूंची नावे आहेत.

भारताने फलंदाजीला दमदार सुरूवात केली असे वाटत असतानाच कर्णदार शिखर धवनने आपली विकेट गमावली. धाव फलकावर केवळ 28 धावा जमा झाल्या असताना पहिला गडी बाद झाला. त्यानंतर पृथ्वी शॉच्या जोडीला खेळायला आलेल्या संजू सॅमसनने अर्धशतकी भागीदारी केली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना पृथ्वी 49 धावांवर पायचित झाला. त्याच्या पाठोपाठ संजू सॅमसननेही 46 धावावर असताना आपली विकेट गमावली. मनिष पांडे आणि सुर्यकुमार यादव यांची जोडी जमतेय असे वाटत असतानाच मैदानावर पावसाने हजेरी लावली.

पावसामुळे खेळ 47 षटकांचा

पावसानंतर सुरू झालेल्या केलात श्रीलंकेच्या गोलंदाजांचा वरचष्मा पाहायला मिळाला. मनिष पांडे 11 धावा, सुर्यकुमार यादव 40 धावा, हार्दिक पांड्या 19 धावा,,नितीश राणा 7 धावा, कृष्णप्पा गौतम 2 धावाकाढून बाद झाले. नवदिप सैनी 15 तर राहुल चहरने 13 धावा काढल्या. अखेरीस खेळायला आलेला चेतन सकारिया 0 धावावर नाबाद राहिला.

अशा प्रकारे भारतीय संघाने मार्यादित 47 षटकांचा खेळही न करता 43. 1 षटकामध्ये आपला डाव गुंडाळला. 225 धावावर भारताचे सर्व खेळाडू बाद झाले.

Last Updated : Jul 23, 2021, 11:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details