महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind W Vs Eng W : भारतीय संघाचा खास सराव, पाहा व्हिडिओ - महिला क्रिकेट

भारतीय संघ मैदानात जोरदार सराव करताना पाहायला मिळत आहे. या सराव सत्रात विशेषकरून क्षेत्ररक्षणांवर खास मेहनत घेण्यात आली. संघाचे फिल्डिंग प्रशिक्षक अभय शर्मा यांच्या निगराणीखाली हे सराव सत्र पार पडले. अभय शर्मा यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यातच दोन गट पाडून छोटीशी स्पर्धा घेतली.

indian-women-team practice ahead-of-1st-odi-against-england
Ind W Vs Eng W : भारतीय संघाचा खास सराव, पाहा व्हिडिओ

By

Published : Jun 26, 2021, 9:08 PM IST

लंडन - भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड माहिला संघ यांच्यात उद्या रविवार (२७ जून) पासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. उभय संघात तीन सामन्याची एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या आधी भारतीय संघाने कस्सून सराव केला. बीसीसीआय वूमन या अधिकृत सोशल मीडियावर या सरावाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

भारतीय संघ मैदानात जोरदार सराव करताना पाहायला मिळत आहे. या सराव सत्रात विशेषकरून क्षेत्ररक्षणांवर खास मेहनत घेण्यात आली. संघाचे फिल्डिंग प्रशिक्षक अभय शर्मा यांच्या निगराणीखाली हे सराव सत्र पार पडले. अभय शर्मा यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यातच दोन गट पाडून छोटीशी स्पर्धा घेतली. सराव चुरशीचा व्हावा, म्हणून यातील विजेत्याला २० पाउंडसचे बक्षीस देखील देण्यात येणार असल्याचे प्रशिक्षक अभय शर्मा यांनी खेळाडूंना सांगितले.

प्रशिक्षकाकडून बक्षिस मिळणार असल्याने खेळाडूंनी झेल पकडण्याचा आणि स्टंपवर चेंडू मारण्याचा जोरदार सराव केला. परंतु, स्पर्धेत दोन्ही गटांनी समान कामगिरी केली. यामुळे कोणताच गट विजयी ठरला नाही.

भारत-इंग्लंड एकमात्र कसोटी सामना अनिर्णीत -

स्नेह राणाच्या नाबाद ८० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला चौथ्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडविरुद्धच्या सामना अनिर्णित राखण्यात यश आलं. इंग्लंडने आपला पहिला डाव ३९६ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरादाखल भारताचा पहिला डाव २३१ धावांत आटोपला. तेव्हा यजमान इंग्लंडने भारतावर फॉलोऑन लादला. भारताने अखेरच्या दिवशी ८ बाद ३४४ धावा करत सामना अनिर्णीत राखला. यात स्नेह आणि तानिया भाटिया (नाबाद ४४) या दोघींनी ९ व्या गड्यासाठी नाबाद १०४ धावांची भागिदारी करत भारताचा पराभव टाळला.

हेही वाचा -काइल जेमिसनविषयी सचिन तेंडुलकरचे मोठं भाकित, म्हणाला, हा तर...

हेही वाचा -टीम इंडियावर टीका करणाऱ्या मायकल वॉनने दिला इंग्लंडला इशारा, म्हणाला...

ABOUT THE AUTHOR

...view details